आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नवापूर शहरातील मुख्य नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करा; अन्यथा गतवर्षाचीच पुनरावृत्ती

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील इस्लामपुरा ते इदगाह रोडपर्यंत मुख्य नाला गेला असून पावसाळ्यात या नाल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरते. तसेच नाल्यात अस्वच्छता निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पालिकेला निवेदन देण्यात आले. नाल्याची स्वच्छता व शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, नाल्याच्या भिंतीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार, नगरसेवक खलील खाटीक, मीनल लोहार यांनी मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर यांच्याकडे केली आहे.

शहरातील मुख्य नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम काही ठिकाणी अपूर्ण राहिले आहे. पावसाळयात या भिंतीमुळे गेल्या वर्षी लोकांच्या घरात नाल्याचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच आताही कायम आहे. या अपुऱ्या बांधकामामुळे पावसाचे पाणी नाल्यातून न जाता नाल्याच्या दुतर्फा वाहते. ते पाणी परिसरात पसरून घरांमध्ये शिरून संसारोपयोगी साहित्य व मालमत्तेचे नुकसान होते. त्यामुळे या वर्षीही अशाच पद्धतीने नुकसान हाेऊ शकते. या नाल्याची सफाई तसेच खोलीकरण न झाल्यास हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्यामुळे जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदारी घेईल का? घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पावसापूर्वीच नाल्याचा गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

बातम्या आणखी आहेत...