आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयी:असली गणाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सोनिया पाडवी विजयी ;मतमोजणीस प्रारंभ

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्राणी पंचायत समितीच्या असली गणाच्या पोट निवडणुकीसाठी ६३.०३ टक्के मतदान झाले होते. ६ जून रोजी अक्राणी तहसिल कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. या मतमोजणीत काँगेसच्या सोनिया वळवी ३ हजार ३४९ मतांनी विजयी झाल्या. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आपल्या गटावर दबदबा कायम ठेवला आहे. असली पं.स. गणासाठी ४ हजार ९६७ स्त्रिया तर ५ हजार १२५ पुरुष असे एकूण १० हजार ९२ मतदार आहेत. पैकी ३ हजार ९२ स्त्री तर ३ हजार २९७ पुरुषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसच्या उमेदवार सोनिया सिपा वळवी यांना ४ हजार ६१६, तर अपक्ष उमेदवार कल्पना मगन वसावे यांना १ हजार २६७ मते मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या स्वतःच्या गावातील निवडणूक असल्याने व येथे अपक्ष उमेदवाराने आव्हान दिल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यात लागून होती. पारंपारिक गटात पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...