आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:कारखान्यास सहकार्य करावे ; पाटील

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपुडा साखर कारखान्याची अडचणीवर मात करून वाटचाल सुरू आहे. ती सुरू राहावी म्हणून सर्वानुमते कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या जो निर्णय घेतला तो हिताच्या ठरला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांनी केले.

पुरुषोत्तमनगर तालुका शहादा येथील कारखाना साइटवर सातपुडा साखर कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्यात दीपक पाटील बोलत होते. या वेळी सातपुडा साखर कारखाना व्हाइस चेअरमन प्रेमसिंग आहेर, नागाईदेवी शुगर लिमिटेड नंदुरबार चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी, पंचायत समिती माजी सभापती माधव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र रावल, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, लेखा परीक्षक शंकर रिजवाई, सहसंचालक उपस्थित होते. प्रथम सचिव छोटूलाल पाटील यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या अहवाल वाचन केले. डॉ. रवींद्र चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...