आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदूरबार:डॉ हिना ताई आपण डॉक्टार आहात, आमच्या आरोग्याची काळजी घ्या - आरोग्य पथकाची हाक

नवापूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पीपीई कीट अभावी डॉक्टर, नर्स व आरोग्य विभागाचे पथक जीव धोक्यात घालून काम करत आहेत

डॉ. हीना गावित स्वाईन फ्लू या साथीच्या रोगावेळी मुंबई येथे त्या विभागाच्या प्रमुख होत्या. पीपीई कीट नसताना सर्वसाधारण खबरदारी घेत रूग्णांची तपासणी व उपचार केले. कोरोना वायरस संदर्भात तपासणी करतांना पीपीई कीट अभावी डॉक्टर, नर्स व आरोग्य विभाग पथकाला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांना स्वसंरक्षणासाठी आवश्यक साहित्य कधी उपलब्ध होईल असा प्रश्न उपस्थित केला असता. डॉ हीना गावित यांनी उपरोक्त उत्तर देऊन वेळ मारण्याचा प्रयत्न केला. परंतू आरोग्य विभागाच्या टीमने डॉ. हीना गावित यांना आरोग्य टीमने हाक दिली आहे. आपण डॉक्टर आहात आमची काळजी घ्या. खासदार यांनी स्वाईन फ्लू प्रादुर्भाव दरम्यान धाडस दाखवले होते. त्यापेक्षा मोठे धाडस नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील 8 महिन्यांची गर्भवती मास्क, ग्लोज, सॅनिटाझर न मिळता गेंदू गावित नर्स सेवा बजावत आहे. आरोग्य विभागाला कधी साहित्य मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. नंदूरबार लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. हीना गावित यांची नवापूर तालुक्यातील कोरोना विषाणू संदर्भात तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याची आढावा बैठक संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात घेतली. यात कोरोना संदर्भात तालुक्यातील परिस्थिती जाणून घेत तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले तर कामचुकार अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. नागरिकांनी घरात राहावे विनाकारण बाहेर पडू नये. मास्क वापर करावा. हात स्वच्छ धुवावे, सॅनिटाझरचा वापर करावा, आजारी पडल्यास सरकारी रूग्णालयात दाखल होऊ उपचार घ्यावा असा सल्ला देखील दिली.  नवापूर तालुक्यातील रेशन वाटप, आरोग्य विषयक समस्या, शहरातील भाजीपाला मार्केट, किराणा दुकानवरील गर्दी, पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत शासनाने नागरिकांच्या खात्यात 500 रुपयांचा पहिला हप्ता जमा होताच बँकेत व बॅंक सुविधा केंद्रावर गर्दी करून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याची तक्रार करण्यात आली. नवापूर तालुक्यात 2429 नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे. 12 लोकांना क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे. सुदैवाने नवापूर तालुक्यात आद्यापत एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. असे असले तरी नवापूर तालुक्यातील सीमेवर 34 मजुरांना नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील इमारतीत ठेवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...