आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवापूर:कोरोना लसीकरणाचे ड्रायरन सुरू; एका व्यक्तीला लस घेण्यासाठी लागतात पाच मिनिटे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी कोरोना लस देण्याचा ड्राय रन सुरू झालेला आहे. सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी ड्राय रनला सुरुवात झालेली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हा ड्राय रन सुरू झाला असून, या ठिकाणी जे आरोग्य सेवक आहेत ज्यांच्या रजिस्ट्रेशन आधी झालेला होत, त्यांना या ड्राय रनमध्ये लस देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे काहीशी भीती या ड्राय रन दरम्यान लस घेण्याच्या प्रात्यक्षिकांचा समावेश असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आली. नंदुरबार येथे ड्राय रन मध्ये पहिली लस घेण्याचा मान रेशमा चाफेटकर या महिला आरोग्य कर्मचाऱ्याला मिळाला.हा ड्राय रन सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा यंत्रणेने पुर्ण तयारी केलेली दिसून आली. विशेष म्हणजे एका व्यक्तीला लस घेण्यासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ लागेला.

नवापूरात नियोजनाचा अभाव
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान ड्रायरन सुरू करण्यात आले त्यापूर्वी परिसरातील स्वच्छता करणे गरजेचे होते परंतू ड्रानरन सुरू असताना स्वच्छता करण्यात आली आहे. ड्रायरन सुरू असताना वैद्यकीय अधीक्षिका यांनी हनुवटीवर मास्क लावून ड्रायरन कार्यक्रमात दिसून आले. ठिकठिकाणी कापसाचे बोळे पडलेले होते. ड्रायरनचे प्रात्यक्षिक करणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना अस्वच्छ उघड्या गटारीवर हात स्वच्छ धुवावे लागले येथे हॅण्डवाॅशचे भांडे दिसून आले नाही. लसीकरणाचे प्रतिक्षा कक्षात पुरेसे उजडे दिसून आले नाही.

कोरोना लसीकरण संदर्भात केंद्र व राज्य सरकार ड्रायरन करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सुचना दिल्या आहेत. नवापुर उपजिल्हा रुग्णालयात नियोजनाचा काहीसा अभाव दिसून आला.

कोरोना लसीकरणात उणीव राहू नये म्हणून ड्रायरन कोरोना लसीकरणाचे प्रत्याक्षिक घेण्यात येत आहे.नवापूरातील हलगर्जीपणा आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरणार तर नाहीना ? यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...