आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधगिरी:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणोर गावकऱ्यांनी बंद केली महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा

शहादा3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मध्यप्रदेशातील सेंधवा येथे कोरोनाचे 3 रुग्ण आढळले, आपल्या गावातील खबरदारीसाठी गावकऱ्यांची उचलले पाऊल

शहादा तालुक्यातील गणोर येथील गावकऱ्यांनी मिळून महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमा बंद केली. गणोर गावातून मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी राखी बुजुर्ग पर्यंत हा रस्ता आहे तेथून मध्यप्रदेश व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर सदर रस्त्यावर दळणवळण करण्यात येते. सध्य परिस्थिती पाहता मध्यप्रदेशातील बडवानी जिल्हयात सेंधवा येथे कोविड-19 चे 3 बाधित रुग्ण आढळून आल्याने आपल्या गावात कोविड-19 च्या खबरदारीसाठी सदर सीमा येणाऱ्या जाणाऱ्यासाठी रस्ता खोदून व मोठ्या काटेरी झाड तोडून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यावेळेस गावातील माझी सरपंच संजय भामरे, नामदेव वळवी,इंदास वळवी, तलाठी श्रीमती आशा देवांग पोलिस पाटील अनिल निकुम,आकिराज भामरे,नितेश भामरे, अरुण पवार माझी उपसरपंच आदींनी मिळून सीमा बंद केली.

बातम्या आणखी आहेत...