आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:नवापूरातील डॉक्टर देतोय अंधेरीच्या सेवन हिल्स रुग्णालयात सेवा, टीमने 12 बाधित रूग्णांना बरे केले

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील नर्सेसही मुंबईत सेवा करीत आहेत

नवापूर शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणारे व्यापारी राजु कोठावदे यांचे चिरंजीव डॉ. निखिल कोठावदे सध्या अंधेरी येथील सेवन हिल्स इस्पितळात सेवा देत आहेत. सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असुन महाराष्ट्र मधून मुंबई येथील प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे, त्यात फक्त अंधेरीत कोरोनाचे 700 बाधित रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यांना जी वैद्यकीय सेवा दिली जात आहे त्या टीम मधील एक महत्त्वाची भूमिका डॉ. निखिल कोठावदे निभावत आहेत. आता पर्यंत डॉ. कोठावदे आणि त्यांच्या चमूने केलेल्या औषधोपोचार मुळे बारा कोरोना बाधित रुग्ण बरे झालेले असून त्यात एका 82 वर्षाच्या आजींचा समावेश आहे. सद्य स्थितीत वैद्यकिय क्षेत्र देत असलेल्या सेवा या एखाद्या देवदूतासारख्या आहे. नवापूर शहरातील आमदार शिरिषकुमार नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी कौतुक केले आहे 

मुंबईतील डॉ. उल्हास वसावे यांची मदत

नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील नर्सेस देखील मुंबई येथे कोरोना आजारा संदर्भात सेवा करीत आहे. मुंबई भागात अनेक भाग सील केले आहे. काहींना राहण्याची व खाण्यापिण्याची देखील अडचण आहे. अश्या परिस्थिती नवापूर तालुक्यातील डॉक्टर उल्हास वसावे मदत करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...