आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात खतांचे नियोजन करण्यात आले असून, १३ हजार ४४२ मेट्रिक टन युरिया खताची मागणी असताना १३ हजार ७७ मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला आहे. मागणीच्या ९७.२८ टक्के खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान २ लाख ६८ हजार ७६३ हेक्टर प्रस्तावित पीक क्षेत्रात १ लाख २४ हजार २५० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात येणार असून ६ लाख २२ हजार ५०० कापूस बियाण्याच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज असून, खतांचे नियोजन करण्यात आले आहे. यात युरिया १३ हजार ७७ मे.टन, डीएपी ३८५ मे.टन, एमओपी ७५९ मे.टन, एसएसपी ६ हजार १२८ मे.टन, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर २ हजार ८०६ मे.टन तसेच मागणीच्या तुलनेत ७८.८१ टक्के अर्थात २३ हजार १५५ मे. टन खत पुरवठा झाला आहे. बियाण्यांत बीटी कापूस, सोयाबीन, भात, मका, संकरित सुधारित बाजरी, ज्वारी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, सुधारित कापूस, तीळ अशा विविध १२ पिकांसाठी बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. यात सोयाबीन २८ हजार ५ क्विंटल, भात २३ हजार क्विंटल, मका ३२ हजार क्विंटल, बाजरी ३ हजार १०० क्विंटल, भुईमूग २१०० क्विंटल, तूर १२ हजार क्विंटल, उडीद १० हजार ४१० क्विंटल, तीळ ५० क्विंटल, मूग ५ हजार ५९८ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. कापसासाठी एकूण २ लाख ३४ हजार ५०० पाकिटांचा पुरवठा झाला आहे.
पुरेशा खतसाठ्यामुळे काळ्या बाजारात खरेदी टाळा दरम्यान पाऊस पडल्यानंतर विविध खते घेण्यासाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होत असते. मात्र यंदा सर्व खतांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या बाजारात काेणतीही खते खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.