आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:१२ जणांच्या विरोधात गुन्हा; पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून पिता-पुत्रांना लोंढरे येथे मारहाण

नंदुरबार21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहादा तालुक्यातील लोंढरे येथे जागेच्या पैशांच्या देवाण घेवाणीवरून पिता-पुत्रांना मारहाण करण्यात आल्याने १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जून रोजी सायंकाळी ५.३०च्या सुमारास घडली. लाठ्याकाठ्या तसेच हाता बुक्क्यांनी उत्तम सूर्यवंशी व अनिल सूर्यवंशी यांना मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी सावळीराम नथ्थू सूर्यवंशी, विजय सावळीराम सूर्यवंशी, रमेश सावळीराम सूर्यवंशी, कमलबाई सूर्यवंशी, रा. लोंढरे, सागर सोमा सोनवणे, सागर सोमा सोनवणे, सजन सोमा सोनवणे, भिकूबाई सोमा सोनवणे, रा.मुल्हेर ता.सटाणा, भागूबाई वडार, रेखाबाई मंगेश वडर, लक्ष्मीबाई सोमा वडर आदींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोउनि जितेंद्र महाजन तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...