आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकविमा:पीकविम्याची रक्कम 8 दिवसांत मिळावी ; आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जून महिना उजाडला तरी देखील मागील वर्षाचा पिक विमाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालय येथे ठिय्या मांडला. येत्या चार दिवसात संबंधित विभागाची बैठक लावून पीक विमा संदर्भात जो प्रश्न आहे तो मार्गी लावू असे सुधीर खांदे यांनी सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. ही रक्कम आठ दिवसात न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाकडून याआधीच पीक विम्याची रक्कम विमा कंपनीला अदा करण्यात आली. असे असतांना देखील कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेले नाही. आठ दिवसात पिक विमाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करा, नाही तर आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, इशारा दिला. या वेळी आम आदमी पक्षाचे बिपिन पाटील, रघुनाथ पाटील, चतुर पाटील, रघुनाथ रडा पाटील, समाधान पाटील, सुरेश पाटील, आशाबाई पाटील, दीपक पाटील, सावळाराम करे, दिलीप पाटील, सदन पाटील, दत्तू पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...