आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीच्या अवकळा:2 हजार 815 शेतकऱ्यांच्या 1575‎ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका‎‎

नंदुरबार‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील सहा‎ तालुक्यांतील २३२ गावांना फटका बसला‎ असून, जवळपास २ हजार ८१५‎ शेतकऱ्यांच्या १ हजार ५७४.८ हेक्टर‎ क्षेत्रात गहू, हरभरा, मका, केळी, पपई,‎ टरबूज, खरबूज, ज्वारीसह विविध‎ पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी‎ पावसात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक‎ अहवाल तयार करण्यात आला आहे.‎ यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा‎ समाेर आला आहे.‎ शहादा तालुक्यातील १ हजार १०४‎ शेतकऱ्यांच्या तोंडातील घास पावसाने‎ हिरावून नेला. तर नंदुरबारच्या ५८२,‎ नवापूरला ३७६, तळोद्याला ५१२,‎ अक्राणीला ८५ व अक्कलकुव्यातील‎ १२६ शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे‎ लागले. जिल्ह्यात एकूण १ हजार ५७५.८‎ हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्राची नोंद‎ करण्यात आली आहे.

यात नंदुरबार‎ ३८७.१ हेक्टर, नवापूर १७७.६ हेक्टर क्षेत्र,‎ अक्कलकुवा ३७.२ हेक्टर, शहादा ७४७‎ हेक्टर, तळेदा ३४४.५हे, अक्राणी ६०‎ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. नंदुरबार‎ तालुक्यातील अवकाळी पावसामुळे गहू,‎ हरभरा, मका, केळी, पपई, टरबूज,‎ खरबूज, नवापूर तालुक्यात मका, गहू,‎ कांदा, रब्बी ज्वारी, केळी, अक्कलकुवा‎ तालुक्यात मका, गहू, ज्वारी, हरभरा,‎ शहादा गहू, ज्वारी, हरभरा, मका,‎ टरबूज, केळी, पपई, तळोदा तालुक्यात‎ गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई तसेच‎ आंबा पिकांचे अवकाळी पावसामुळे‎ नुकसान झाले. अक्राणी तालुक्यात गहू,‎ मका या पिकांचे नुकसान झाले आहे.‎ शासनाने त्वरित या नुकसानीची दखल‎ घेऊन भरपाई द्यावी, अशी मागणी‎ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.‎

नंदुरबार तालुक्यात ६२ गावांना नुकसान‎
अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका शहादा तालुक्याला बसला‎ असून, यातील ७९ गावे प्रभावित झाली आहेत. तर त्या खालोखाल‎ नंदुरबार तालुक्यातील ६२ गावांना अवकाळी पावसाचा फटका‎ बसला. अक्राणी तालुक्यातील सात, अक्कलकुवा तालुक्यातील १५‎ गावे अवकाळी पावसाच्या फेऱ्यात सापडली. नवापूरची ३५ तर‎ तळोद्यातील ३४ गावांत नुकसान झाले.‎

लवकर नुकसान भरपाईची अपेक्षा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी अहवाल तयार‎ केला आहे. पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित,‎ खासदार डॉ. हीना गावित यांनी सर्व नुकसानग्रस्त गावांची‎ पाहणी केली होती. शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत‎ रघुवंशी यांनीही पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या‎ नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे, असे निवेदन दिले‎ होते. जिल्ह्यातील कृषी व महसूल यंत्रणेने तत्काळ‎ नुकसानीची आकडेवारी शासनासमोर ठेवल्याने‎ लवकरच भरपाई मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.‎

चार गुरे मृत, १९ घरांची पडझड‎
नवापूर तालुक्यात एका जनावराचा मृत्यू झाला आहे.‎ नंदुरबार तालुक्यातील तीन जनावरे वीज पडून मृत पावली‎ आहे. नंदुरबार तालुक्यात २ घरांचे अंशत:, जिल्हा‎ परिषदेच्या शाळेची वर्गखोलीचे पत्रे उडाली, नवापूर‎ तालुक्यात १३ घरांचे अंशत: नुकसान, तळोदा २ घरांचे‎ अंशत: नुकसान असे मिळून १९ घरांची पडझड झाली.

बातम्या आणखी आहेत...