आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:‘दलित वस्ती सुधारचा निधी‎ विकास कामासाठी वापरावा’‎

तळाेदा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा नगर परिषद‎ अंतर्गत दलित वस्ती सुधार‎ योजनेचा संपूर्ण निधी‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर‎ नगरातील विविध विकास‎ कामांसाठी वापरण्यात यावा,‎ अशी मागणी आंबेडकर‎ नगरातील रहिवाशांनी‎ मुख्याधिकारी यांच्याकडे‎ निवेदनाद्वारे केली आहे.‎ प्रभाग क्रमांक ५ मधील‎ डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर‎ येथे मोठ्या प्रमाणात अनुसूचित‎ जातीची लोकवस्ती आहे.‎ अद्यापपर्यंत सुधार योजनेतून‎ बऱ्याच वर्षांपासून काेणत्याही‎ प्रकारचे विकास काम झालेले‎ नाही. खुल्या गटारी, रस्ते, पेव्हर‎ ब्लॉक, पथदिवे, पाण्याची‎ पाइपलाइन अादी कामे झालेली‎ नाहीत. त्यामुळे त्वरित विकास‎ कामे करण्यात यावीत. अशी‎ मागणी निवेदनातून करण्यात‎ आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...