आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस:कळंबू शिवारात अवकाळी‎ पावसामुळे पिकांचे नुकसान‎

सारंगखेडा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारंगखेडा परिसरात अचानक झालेल्या‎ अवकाळी पावसामुळे मका, गहू अादी पिकांचे‎ अतोनात नुकसान झाले अाहे.‎ कळंबू येथील पंकज बोरसे या‎ शेतकऱ्याच्या चार एकर क्षेत्रातील मका‎ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.‎ अवकाळी पावसामुळे जवळपास साठ हजार‎ रुपये खर्च करून तयार झालेले मका पीक‎ वाया गेल्याची भीती व्यक्त होत आहे.‎ हातातोंडाशी आलेला घास मंगळवारी‎ झालेल्या अवकाळी पावसाने हिरावून नेला‎ आहे. तसेच प्रमिला सुरेश देवरे यांचा देखील‎ दोन एकर गहू जमीनदोस्त झाल्याची घटना‎ घडली आहे. कळंबू शिवारातील दगडू बोरसे‎ यांचे सात एकरमधील टरबूज, दीड‎ एकरमधील खरबूज, चार एकरमधील केळी,‎ चार एकरमधील पपईचेही नुकसान झाल्याची‎ घटना घडली आहे. नुकसानीचे तत्काळ‎ पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी सर्व‎ शेतकऱ्यांकडून होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...