आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या दुर्घटनेची शक्यता:मोलगी रस्त्यावरील कोसळणाऱ्या दरडींमुळे धोका

अक्कलकुवाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा आणि मोलगी या गावांना तसेच विशेषतः सातपुड्याला जोडणाऱ्या देवगोई घाटात वारंवार दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याने वारंवार कोसळणाऱ्या दरडवर उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.सातपुड्याला जोडणाऱ्या अक्कलकुवा ते मोलगी या मार्गावर सध्या दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कधी कधी एक ते दोन तासांपर्यंत रस्ता बंद होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी देखील या घाटात दरड कोसळल्याने जवळपास दोन तासाहून अधिक काळ हा रस्ता बंद झाला होता. पावसाळ्यानंतर या घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

त्यातच काही साहसवीर दरड कोसळत असतांना ही जीव धोक्यात घालून रस्त्यावरील दगड गोटे व मलबा हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मंगळवारी ही दरड कोसळल्यानंतर वाहनधारकांनी दरड कोसळत असताना घाई गर्दीने दगडगोटे बाजूला सारून मोटारसायकली नेण्याचा प्रयत्न केला. त्यात याठिकाणी अनेक वाहने घसरुन पडत असल्याचे चित्र दिसून आले. तरीदेखील वाहने पुढे रेटण्याचा मोह वाहन धारकांना आवरता येत नव्हता. गेल्या कित्येक दिवसांपासून डाब ते देवगोई घाटापर्यंत अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. मात्र त्या दरडचा मलबा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी अत्यंत अरुंद झाला आहे. परिणामी या ठिकाणी मोठया अपघाताची दाट शक्यता आहे. असे असताना दरडचा मोठ्या प्रमाणावर पडलेला मलबा का उचलण्यात आला नाही, हा प्रश्न वाहन धारकांसमोर आहे. अनेक ठिकाणी डोंगरावर मोठ मोठे दगड आणि माती ही अधांतरी अवस्थेत आहे. परिणामी ते कधीही कोसळू शकतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे या दरडींबाबत ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...