आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयास्पद:पिंप्रीत मृत मादी बिबट्या आढळला

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंप्री येथील एका शेतात बुधवारी दीड वर्षीय सुदृढ बिबट्या मृतावस्थेत आढळला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोरणमाळ वन विभागाच्या राणीपूर येथील मुख्य कार्यालयात आणला. बिबट्याच्या मृत्यूची माहिती शेतकऱ्याने बुधवारी दिली असली तरी त्याचा मृत्यू दोन-तीन दिवस आधी झाल्याने ताे संशयास्पद असल्याचे घटनास्थळी उपस्थितांकडून बोलले जात होते.

अन्नाच्या शोधात निघालेल्या बिबट्याचा मृत्यू विषारी भक्ष्य खाल्ल्याने झाला असावा, अशी शक्यता प्रत्यक्षदर्शी शेतकरी व काही गावकऱ्यांनी व्यक्त केली. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह पाहिल्यानंतर परिसराची कसून चौकशी सुरू केली. हा बिबट्याचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या प्रतिक्रिया वन विभाग अधिकाऱ्यांनीही व्यक्त केल्या. याबाबत कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

पिंप्री येथील शेतकरी संजय श्रीपत पाटील त्यांच्या आवगे शिवारातील शेतात बुधवारी सकाळी शेती कामासाठी पाेहाेचले. त्यावेळी त्यांना मृत बिबट्या आढळला. वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याची तपासणी केली तपासणी केली. हा मादी बिबट्या असून त्याचे वय सरासरी दीड वर्षाचे असल्याचे सांगितले. डुकरांनी फवारणी केलेल्या पीक खाल्ल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असावा व त्यांचे मांस या मादी बिबट्याने खाल्ल्याची शंका व्यक्त केली. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच खरे कारण कळेल.

बातम्या आणखी आहेत...