आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकल्चरल फाउंडेशनच्या वतीने रविवारी आयोजित नगराध्यक्ष करंडक देशभक्ती व लोकनृत्य स्पर्धेत शहरासह तालुक्यातील १४ शाळांनी सहभाग घेतला. देशभक्तीपर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मूकबधिर विद्यालयाने तर लहान गटात प्यारीबाई ओसवाल विद्यालयाने पटकावला. नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते दुपारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या स्पर्धेचा समारोप संध्याकाळी ७ वाजता झाला.
स्पर्धेच्या दाेन्ही गटांचा निकाल असा : मोठ्या गटात समूह नृत्य स्पर्धेत मूकबधिर विद्यालय प्रथम, अभिनव विद्यालय द्वितीय, मिशन विद्यालय तृतीय क्रमांक तर शासकीय मुलींची आश्रम शाळा होळ व डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल यांना उत्तेजनार्थ पारिताेषिक मिळाले.
लहान गटात प्यारीबाई ओसवाल प्रथम, माय चाइल्ड पब्लिक स्कूल द्वितीय, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले. महेंद्र पब्लिक स्कूल, एकलव्य विद्यालय या दोन्ही शाळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सोलो नृत्य प्रकारात निवेश अग्रवाल, प्रतीक्षा भुसणार व रक्षित शर्मा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. तर दुसऱ्या गटात विशाल चौधरी, ईशिका जग्याशी व नेहा महाजन यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. प्राजक्ता इंदवे, गौरी पटेल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश रघुवंशी, बांधकाम सभापती अमित रघुवंशी, प्रा.सुभाष मोरावकर, श्रीराम मोडक, प्रोजेक्ट चेअरमन दुर्गेश वैष्णव, प्रवीण पाटील, चंपालाल चौधरी, काशीनाथ सूर्यवंशी, जितेंद्र खवळे, केशव राजभोज, अग्रवाल यांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले. स्पर्धेचे परीक्षण गजानन तोष्णीवाल, अकोला यांनी पाहिले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कलावंत घडतात : रघुवंशी सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कला-गुणांना वाव मिळतो. शहरातील अनेक कलावंत राज्यस्तरावर गाजत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने बालकांसह पालकांमध्येही उत्साह असतो. नगराध्यक्ष करंडक स्पर्धा १७ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. यासाठी राजेश रघुवंशीसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. बक्षिसांच्या रकमेत आयोजकांनी कंजुषी करू नये. चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार, नंदुरबार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.