आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनिष्ट रूढी परंपरांना हद्दपार करणे, वेळ पैसा आणि श्रम वाया घालवणाऱ्या कार्यक्रमांना पायबंद घालणे, तरुणाईचे भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शक शिबिरांच्या माध्यमातून नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करणे, निराधार विधवा परित्यक्त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रभावी प्रयत्न करणे, तसेच प्री-वेडिंग व्हिडिओ शूटिंगवर बंदी घालण्याचा निर्णय आदी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रकाशा येथील गौतमेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडीले होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष वानखेडे, सुपडू खेडकर, जयवंत मोरे, गणेश शिवदे, तुकाराम लांबोळे, नरेंद्र वाडीले, संजय साठे, प्रवीण रामोळे, महेंद्र बोरदे, भिला भोई, रतिलाल वाडीले, उज्ज्वल मोरे, संगीता रामोळे, अलका साठे आदी उपस्थित होते. निवृत्त मुख्याध्यापक बाबुलाल वाडीले यांनी समाज प्रबोधनपर स्वरचित कविता म्हटली. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडीले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यांची विस्तारीत कार्यकारिणी जाहीर केली. या वेळी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस चंद्रवदन मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.