आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्षानुवर्षे विविध समस्यांचा सामना करणाऱ्या कोटी नगर (ता.अक्कलकुवा) या गावाला नुकताच स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला खरा; परंतु तेथील नागरिकांना स्वस्त धान्यासाठी दऱ्या-खोऱ्यांतून करावी लागणारी पायपीट मात्र थांबलेली नाही.
अवघड पायवाटांवर पडणारी ही पावले थांबवण्यासाठी कोटी नगरला स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदारांना निवेदन देत तेथील नागरिकांनी केली. अतिदुर्गम भागातील कोटी नगर हे मोगरा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव असून स्वस्त धान्यासाठी ११० कुटुंबांना शिधापत्रिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
या शिधापत्रिका धारकांना ओघाणी येथील स्वस्त धान्य दुकानाशी जोडले असून ते त्यांच्यासाठी गैरसोयीचे ठरत आहे. हक्काच्या धान्यासाठी कोटी नगर वासीयांना दऱ्या-खोऱ्यातील अवघड अशा पायवाटेने जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ओघाणी येथील स्वस्त धान्य दुकानाचे विभाजन करून कोटी नगरला स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान द्यावे, वाढते कुटुंब व लोकसंख्येच्या आधारे कोटी नगर गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळाला आहे.
त्याप्रमाणे महसूल विभागाने गावाला स्वतंत्र स्वस्त धान्य दुकान मंजूर करावे, अशी अपेक्षा तेथील नागरिकांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. स्वतंत्र महसुली गावाप्रमाणे रेशन दुकानही मंजूर करा कोटीनगर वासीयांना स्वस्त धान्यासाठी दऱ्या-खोऱ्यातील पायवाटेने ओघाणी गाठावे लागते.
दरम्यान जंगली श्वापदे व पाय घसरून अनर्थ घडण्याचा धोका अधिक संभवतो. अशा संभाव्य अनेक धोक्यातून सुटका करण्यासाठी गावाला स्वतंत्र महसुली गाव म्हणून घोषित केले गेले. त्याचप्रमाणे स्वतंत्र रेशन दुकानही मंजूर करावे, अशी अामची मागणी अाहे.
-मगनसिंग वसावे, माजी सरपंच, ओघाणी-मोगरा, ता.अक्कलकुवा.
स्वतंत्र महसुली गावाप्रमाणे रेशन दुकानही मंजूर करा
कोटीनगर वासीयांना स्वस्त धान्यासाठी दऱ्या-खोऱ्यातील पायवाटेने ओघाणी गाठावे लागते. दरम्यान जंगली श्वापदे व पाय घसरून अनर्थ घडण्याचा धोका अधिक संभवतो. अशा संभाव्य अनेक धोक्यातून सुटका करण्यासाठी गावाला स्वतंत्र महसुली गाव म्हणून घोषित केले गेले. त्याचप्रमाणे स्वतंत्र रेशन दुकानही मंजूर करावे, अशी अामची मागणी अाहे.
-मगनसिंग वसावे, माजी सरपंच, ओघाणी-मोगरा, ता.अक्कलकुवा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.