आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कामगार धोरणाविरोधात शेतमजूर युनियनची निदर्शने, दिवसांचा संप करून केंद्र सरकारला इशारा

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या चारश्रम संहिता रद्द करून पूर्वीच्या कामगार हिताचे कायद्यांची अंमलबजावणी करावी. सरकारच्या सार्वजनिक उद्योग धंदे विक्री करण्याचे बंद करावे. डिझेल, पेट्रोलची दरवाढ रद्द करून महागाईस आळा घाला यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी शेतमजूर व शहरातील कामगारांनी दोन दिवसांचा संप करून केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकार देशातील सार्वजनिक उद्योग, धंदे कार्पोरेट देशी व विदेशी भांडवलदारांना कवडीमोलाने कारखाने विक्री करीत आहे. रेल्वे, विभागतळ, विजेवर चालणाऱ्या कंपन्या, बीएसएनएल वगैरे अदाणी व अंबाणीसारख्या उद्योगपतींना देण्याचा सपाटा चालवला आहे. तसेच बँका देखील खासगीकरण करीत असून देशातील लाखो कामगार व मजूर बेरोजगार होत आहेत. उद्योगपतींना मनमानी पद्धतीने कारभार करण्यासाठी पूर्वीचे लाभदायक कामगारांचे हिताचे २९ कायदे रद्द करुन उद्योगपतींच्या मर्जीप्रमाणे काम करण्यासाठी चार श्रमसंहिता कायदा अंमलात आणण्याचा प्रकार करीत आहे. त्याच्या विरोधात निदर्शने करून आंदोलन केले. नायब तहसीलदार राजेश अमृतकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नथ्थू साळवे, गुंताबाई न्हाये, सनू न्हाये, सखुबाई सोनवणे, रामसिंग मोरे, बिरजाबाई मालचे, संजय भिल, गणेश पाटील, प्रमोद पाटील, गिरीश भोमले, विपुल कासार, प्रशांत बारी, जितेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...