आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य बिघडले:नंदुरबार शहरात डेंग्यूचा डंख; दररोज 4 ते 5 रुग्णांची वाढ

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा अधिक पाऊस झाला. त्यानंतर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसह अनेक मैदानांवर पाणी साचले. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक भागात डांस, मच्छरची उत्पत्ती झाली असून यामुळे डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दररोज दोन ते पाच डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत असून पालिकेकडून डासांना मारण्यासाठी फवारणी करण्यात येत आहे.

नंदुरबार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये ऑक्टोबरमध्ये ५ डेंग्यूचे पाच रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दररोज दोन डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहे. त्यात एका खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दोन डेंग्यूचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. पालिकेने फवारणी अधिक प्रमाणात करावी अशी मागणी होत आहे.

डबक्यांमुळे होतेय डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती
यंदा चांगला पाऊस झाला. परतीचा पाऊसही बराच दिवस सुरू होता.त्यामुळे अनेक भागात डबके साचले आहेत. यामुळे मच्छर व डासांची उत्पत्ती झाली आहे. या रुग्णांची संख्या वाढते आहे. चिकुन गुन्या सारखे रुग्णदेखील आहेत. मात्र लॅबराेटरीमध्ये त्याचा दुजाेरा मिळाला नाही.

डासांपासून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी
नंदुरबार शहरात अनेक दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. दररोज दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला की डेंग्यू रुग्णांची संख्या वाढते. नागरिकांनी काळजी घ्यावी.-डाॅ. राजकुमार पाटील, फिजिशियन,नंदुरबार

तक्रार भागात तत्काळ फवारणी केली जाते
नंदुरबार शहरात ज्या भागात डास, मच्छरचे प्रमाण वाढले अशी तक्रार येते, तेव्हा त्या भागात तत्काळ फवारणी केली जाते. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यू रुग्णांची माहिती घेऊन त्या भागात फवारणी केली जाईल.-विशाल काम, अधिकारी, पालिका, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...