आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवापूर शहरातील सर्वात मोठ्या शोली पोल्ट्रीतील कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी किलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. शोली पोल्ट्रीत साधारण 2 लाख 37 हजार पक्षी आहे तर, 30 लाख अंडी आहेत. महिन्याभरात 6 लाख 51 हजार पक्षी व 27 लाख अंडी नष्ट करण्यात आली आहे.
गुरुवारी शहरातील शोली पोल्ट्रीचे पक्षी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत शुक्रवारी शोली पोल्ट्रीतील सर्व पक्षी टप्प्या-टप्प्याने नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे. चार दिवसात शोली पोल्ट्रीतील कुकुट पक्षी नष्ट करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी 20 पशुसंवर्धन विभागातील पथकांमार्फत किलिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. साधारण 250 कर्मचारी पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी व 170 खाजगी मजुरांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांनीद दिली आहे.
गेल्या एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूने थैमान घातल्याने राज्यातील सर्वात मोठ्या कुकुट पक्षांचे किलिंग ऑपरेशन नवापूर तालुक्यात सुरू आहे. एकूण 29 पोल्ट्रीततील बर्ड फ्लूग्रस्त साडे सहा लाख कोंबड्या पक्षी नष्ट करण्यात आल्या आहेत.
नवापूर शहरात शुक्रवारी चार पोल्ट्रीतील अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पेरानीयार पोल्ट्री 28 हजार, पक्षी पॅराडाईज 4 हजार 600, रीची 6 हजार 500 पक्षी, अशरफ पोल्ट्री 12 हजार, अशा या चार पोल्ट्रीतील एकूण 51 हजार 100 पक्षी व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
नवापूर तालुक्यात आतापर्यंत एकूण 29 कुक्कुटपालन केंद्रातून 6 लाख 51 हजार 303 कुक्कुट पक्षी व 27 लाख अंडी बर्ड फ्लू आजारामुळे नष्ट करण्यात आले आहे. नवापूर तालुका बर्ड फ्लूचा महाराष्ट्र राज्यातील मोठा हॉटस्पाट ठरला आहे. नवापुर तालुक्यातील बर्ड फ्लूचे लोन थेट गुजरात राज्यसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यात देखील पसरले आहे. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय सुरू होता. परंतु बर्ड फ्लूचा शिरकावने पूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला आहे. 29 पोल्ट्री व्यवसायिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.