आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकाचे मोठे नुकसान:रानडुकरांकडून मका, ज्वारीची नासधूस ; शेतकऱ्यांचे नुकसान

तळोदा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा तालुक्यातील उमटी जामलीसह लगत असणाऱ्या गावातील शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून मका, ज्वारी, भुईमूग इतर पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून नुकसान झालेल्या पिकांची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.अक्कलकुवा तालुक्यात ग्रामीण भागात सध्या पाण्याचे स्त्रोत कमी झाले असून, अन्नाच्या शोधात भटक्या जनावरांसह रानडुकरे उभ्या पिकात घुसून नासाडी करताना दिसत आहेत. मका ज्वारी खाण्यासाठी आलेली रानडुकरे मोठे नुकसान करून जमीनदोस्त करून खात असल्याने उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रमेश बाज्या तडवी, अशोक मुंगल्या तडवी, कांतीलाल दाज्या तडवी, दाजला फुलजी तडवी, खाअल्या आरशी तडवी, पाण्या हांद्या तडवी, कांतीलाल हांद्या तडवी, साज्या मोत्या तडवी, मोत्या मोयला तडवी, वाण्या दाज्या तडवी, सामा मोत्या तडवी, जात्र्या पोपटा तडवी, सिला बोगा तडवी, भीमा सांगल्या तडवी, साकरा उगराण्या तडवी, मोगना पोपटा तडवी, सिंगा रामा तडवी, काल्या रामा तडवी, गुलबा आरसी तडवी, रमेश आरसी तडवी, खिमजी आरशी तडवी, धर्मा कर्मा तडवी, पारता दाज्या तडवीसह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.

नुकसान भरपाई द्यावी
जामली परिसरातील शेतकरी जेमतेम उदरिर्वाहासाठी रानडुक्कर शेतातील पिकांची नासधूस करून नुकसान करीत आहे. त्यामुळे शेतकरी डोळ्यात तेल ओतून पिकांची रखावाली करीत आहे. तरी देखील रानडुक्कर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. त्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपई देण्याची मागणी होत आहे. अजय तडवी, शिवसेना शाखा प्रमुख

बातम्या आणखी आहेत...