आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राज्यातील नवे प्रयोग नेहमी शहाद्यातून : जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस-जयंत पाटील एकाच वाहनाने कार्यक्रमस्थळी

शहादा/नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणमहर्षी पी.के. अण्णा पाटील यांनी सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात क्रांती केली. राजकारणात मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही. त्यांच्या कार्यामुळे समाजात परिवर्तन झाले. शिक्षणाची गंगा सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यापर्यंत पोहोचली, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोणत्याही चांगल्या कामाचा शुभारंभ सर्वप्रथम शहाद्यातून होतो. आधार कार्डचाही शुभारंभ येथूनच झाला. नवनवीन प्रयोग या मातीत पी.के. अण्णा यांनी केल्याचेही मत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. लोणखेडा येथे पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकासमंत्री अॅड. के.सी. पाडवी, रावेरच्या खासदार रक्षा खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

मनावर घेऊ नका : पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजी-माजी आणि भावी सहकारी या विधानावरून महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्ष नाराज आहेत का ? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, अशी कसलीही नाराजी नाही. भाषणातून अशा प्रकारची वक्तव्ये होतच असतात. ते फार मनावर घेऊ नये. मित्रपक्षात सर्व काही व्यवस्थित आहे.

अंदाज बांधू नका : फडणवीस
जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत, एकाच व्यासपीठावर होते त्यावरूनही जोरदार चर्चा सुरू आहे. यासंदर्भात फडणवीस म्हणाले की, मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो, एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये.’

देवेंद्र फडणवीस-जयंत पाटील एकाच वाहनाने कार्यक्रमस्थळी
पी.के. अण्णा पाटील यांच्यावर प्रेमापोटी सर्वपक्षीय नेते या सोहळ्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. कुणीही राजकारणावर न बोलता फक्त पी.के. अण्णा पाटील यांच्या कार्यावर भाष्य केले. या वेळी देवेंद्र फडणवीस व जयंत पाटील हे दोन्ही नेते कार्यक्रमस्थळी एकाच वाहनाने आले. राजकीय जोडे त्यांनी या कार्यक्रमाच्या बाहेर काढले. त्याची येथे चर्चा होती.

बातम्या आणखी आहेत...