आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दुधाळ्यात दत्त जयंतीनिमित्त भक्तीचा साेहळा

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दुधाळे येथे दत्त जयंतीनिमित्त बुधवारी दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. मंदिर परिसरात दाेन दिवसीय यात्रोत्सव भरला असून दर्शनासाठीही भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून आले.दत्त जयंतीनिमित्त नंदुरबार शहरासह ग्रामीण भागात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली. दुधाळे येथे सकाळी ९ वाजता दत्त पूजन, १० वाजता महाआरती करण्यात आली तर रात्री ८ ते १० यावेळेत कीर्तन झाले. दुधाळे पंचक्रोशीमध्ये एकमेव दत्ताचे मंदिर असल्याने भाविकांची दिवसभर दर्शनासाठी गर्दी झाली होती.

महाआरती सामाजिक कार्यकर्ते सत्यप्रकाश माळसे व दुधाळेच्या सरपंच अश्विनी माळसे यांच्या यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती माया माळशे वळवी, उद्योजक ताराचंद माळशे आदी उपस्थित हाेते. गुरुवारी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. भाविक, भक्तांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...