आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा कर्मचाऱ्यांनी निर्धार केला होता. त्यानुसार शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. यामुळे सर्वच शासकीय कार्यालये ओस पडली होती. धडगाव येथे तहसीलदार, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना विविध कर्मचारी संघटना व जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शासकीय सेवेत नोव्हेंबर २००५ पासून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना लागू केली आहे.
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आग्रही आहेत. शासनाने आजपर्यंत कोणतेही सकारात्मक पाऊल उचललेले नाही. महाराष्ट्र नागरीसेवा निवृत्तिवेतन१९८२ व १९८४ पुन्हा पूर्ववत लागू करावी या मागण्या व इतर मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. दरम्यान येथील पंचायत समिती आवारात कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून एकच मिशन जुनी पेन्शन मागणीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. निवेदनावर व्ही. डी. पाटील, अविनाश पाटील, प्रभाकर गवळी, परमाळकर, नागीण पाटील, धीरसिंग वसावे, रूपेश नागलगावे, प्रवीण दरेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.