आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:धनगर समाज आरक्षणासाठी उठावाची गरज ; कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.चिमण डांगे यांचे प्रतिपादन

नंदुरबार23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाभिमुख कार्य करण्यासाठी सर्व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून काम करावे. धनगरांना अनुसूचित जमातीप्रमाणे योजनांचा लाभ मिळावा, समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे आरक्षण मिळावे व मेंढपाळ बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या विरुद्ध उठाव करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड.चिमणराव डांगे यांनी येथे केले.

धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी महासंघ व सांस्कृतिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष अलका घोडे, महासंघाचे राज्य सरचिटणीस सुनील वाघ, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश निर्मळ, अप्पा बागले, विठ्ठल लांडगे, गोरख पाटील, आनंदा कुवर, भास्कर धनगर, दीपक भालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चिमणराव डांगे म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली काही संघटना पैसा गोळा फिरत आहेत. हा त्यांचा एकमेव धंदा आहे. त्या उलट धनगर समाज महासंघाची कायदेशीर नाेंदणी झाली आहे. राज्यात आगामी भूमिका काय ठेवायची, याबाबत रणनिती आखली जाणार आहे. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायचा असेल तर राज्य शासनाला धनगरांची ताकद दाखवावी लागेल. तरच ते केंद्र शासनाकडे धनगर समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करू शकेल, असेही ते म्हणाले.मेंढपाळांना चराई बंदी केल्याने त्यांनी जगावे कसे? असा प्रश्न आता पडला आहे. वनमंत्र्यांना भेटून चराई बंदी उठवायची मागणी करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...