आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार-धानाेरा मार्गादरम्यान असलेल्या ढेकवद या रेल्वे गेटचे रेल्वे विभागाच्या वतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने २ ते ५ फेब्रुवारीच्या सायंकाळपर्यंत तब्बल चार दिवस नंदुरबार ते धानोरा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गे हाेणारी वाहतूक वळवण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती संदर्भात अचानक हा निर्णय घेतल्याने पाेलिस प्रशासनाची वाहतुकीच्या संदर्भात नियोजन करताना धावपळ उडाली. नारायणपूर व पाचोरा बारी हे दोन पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. मात्र त्यांचे सरासरी अंतर पाच कि.मी. इतके असल्याने नंदुरबारकरांना फेऱ्याचा भुर्दंड पडणार अाहे.
नंदुरबार ते धानाेरा या मार्गावरील गेट रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार असल्याने शहर पोलिसांनी काळजी घ्यावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिले आहेत. ढेकवद परिसरात दोन गेट असल्याने अनेकांना या रेल्वे गेटच्या संदर्भात आधी संभ्रम निर्माण झाला.
त्यानंतर पोलिस विभागाने काेणत्या गेटजवळ दुरुस्तीचे काम होणार, याची माहिती घेतली. तेव्हा धानोरा मार्गावरील ढेकवद रेल्वे गेट चार दिवस बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. माळी वाड्याच्या पुढे हे ढेकवद रेल्वे गेट आहे.
पाचोरा बारीपासून ढेकवद गावासाठी मोठ्या वाहनांना प्रवेश असेल. तर पाचोरा बारीचे रेल्वे गेट बंद आहे; परंतु पर्यायी मार्ग म्हणून तेथील पुलाखालून गाड्या सुरू आहेत. लहान वाहने, दुचाकी वाहनांसाठी माळी वाडा, नारायणपूर मार्गे वाहतुकीची पर्यायी व्यवस्था आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने रूळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांचे पत्र मिळताच जिल्हा प्रशासनाने पोलिस प्रशासनाला माहिती दिली.
शिक्षकांसह विद्यार्थी, शेतकऱ्यांना करावा लागणार पर्यायी मार्गाचा अवलंब
रेल्वे दुरुस्तीचे काम सुरू होणार, रस्ता बंद होणार या संदर्भात माध्यमांना माहिती देत असताना पर्यायी मार्ग काेणता, असा प्रश्न ‘दिव्य मराठी''ने उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने धावपळ करत पर्यायी मार्ग निश्चितीचे निर्देश दिले. धानोरा मार्गावर शेतीसह अनेक गावे, आश्रम शाळा, शाळा आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या शिक्षकांसह शेतकऱ्यांना चार दिवस त्याएेवजी अन्य मार्गाचा वापर करावा लागेल.
ऐनवेळी मिळाली सूचना; उडाली तारांबळ
पाचोरा बारीपासून ढेकवद गावासाठी मोठ्या वाहनांना प्रवेश असेल. तर पाचोरा बारीचे रेल्वे गेट बंद आहे; परंतु पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक सुरू अाहे. लहान वाहने, दुचाकी वाहनांसाठी माळी वाडा, नारायणपूर मार्गे वाहतुकीची पर्यायी व्यवस्था आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांचे पत्र मिळताच जिल्हा प्रशासनाने पोलिस प्रशासनाला वाहतूक वळवण्याची सूचना केली; परंतु ऐन वेळी पत्र प्राप्त झाल्याने प्रशासनाला नियोजन करताना तारांबळ उडाल्याचे चित्र हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.