आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खो-खो स्पर्धेत धुळे, नाशिक, नगर संघाची विजयी खेळी

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस मुख्यालय, नंदुरबार येथील मैदानावर ३३ व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत खेळल्या गेलेल्या स्पर्धे दरम्यान परिक्षेत्रातील सर्व संघांमध्ये सर्वसाधारण विजेते पदासाठी जोरदार संघर्ष पाहावयास मिळाला.खो-खोच्या सामन्यांमध्ये अहमदनगरच्या पुरुषांच्या संघाने धुळे संघाचा, तर धुळ्याच्या महिला संघाने अहमदनगरचा, नाशिक ग्रामीणच्या पुरुष व महिला संघाने जळगावच्या पुरुष व महिला संघाचा, नाशिक शहराच्या पुरुष संघाने नंदुरबारच्या संघाचा पराभव केला.

कबड्डीच्या सामन्यांमध्ये नाशिक ग्रामीणच्या पुरुष संघाने नाशिक शहरावर ५ गुणांनी व नंदुरबारच्या संघावर विजय मिळवला तर धुळेच्या पुरुष संघाने जळगावच्या संघावर सहज विजय मिळवला. तसेच पुरुषांच्या लांब उडी या क्रीडा प्रकारात नाशिक शहरचे प्रशांत लोंढे यांनी ५.२९ मी. लांब उडी मारुन प्रथम क्रमांक पटवला तर धुळ्याचे भगवान ढाकणे यांनी ५.१२ मी. लांब उडी मारून द्वितीय क्रमांक. त्याचप्रमाणे महिलांच्या लांब उडी या क्रीडा प्रकारात नंदुरबारचे दिव्या वाघमारे यांनी ४.२० मी. लांब उडी मारून प्रथम क्रमांक पटकावला तर जळगावचे वैशाली सादरे यांनी ३.८३ मी. लांब उडी मारून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच क्रॉस कंट्री या क्रीडा प्रकारात नाशिक शहर पोलिसांचा दबदबा पाहावयास मिळाला.

५००० मीटर पुरुषांच्या क्रॉसकंट्रीमध्ये नाशिक ग्रामीणचे सावळीराम शिंदे व मारुती माळी अनुक्रमे प्रथम व द्वितीय होते. तसेच महिलांच्या ५००० मीटर क्रॉस कंट्रीमध्ये नाशिक शहराची अश्विनी देवरे व नाशिक ग्रामीणची पल्लवी कुंवर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. ४ x १००मीटर रिले पुरुषांच्या धावण्याच्या शर्यतीत नाशिक शहर प्रथम व धुळे संघ द्वितीय क्रमांकावर तर ४ x ४०० मीटर रिले महिलांच्या धावण्याच्या शर्यतीत अहमदनगरने प्रथम व जळगावने द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या अंतिम सामन्यामध्ये नंदुरबारच्या नाना पाडवीने प्रथम तर नाशिक शहराचे दिनेश माळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

धावण्यात नगर,नाशिकचे वर्चस्व
पुरुषांच्या ३००० ट्रीपल चेस धावण्यात अहमदनगरचे मारुती माळी व नाशिक शहराचे गोरख जाधव प्रथम व द्वितीय राहिले. पुरुषांच्या ८०० मीटर धावण्यत नाशिक शहराचा अंकुश पावरा प्रथम व अहमदनगरचा रामहरी तिडके द्वितीय राहिला. महिलांच्या ८०० मीटर धावण्यात अहमदनगरची मीरा हांडे व धुळ्याची सपना पवार अनुक्रमे प्रथम व द्वितीय राहिले.

बातम्या आणखी आहेत...