आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूर तालुक्यात नागरिकांचा जीवघेणा प्रवास:विसरवाडीत पाचव्यांदा धुळे-सुरत महामार्ग बंद; लोकांच्या यातना कधी थांबणार?

नवापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील छोटा पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. एका महिन्यात सलग पाचव्यांदा महामार्ग वाहतूक पूर्णपणे बंद झाली. नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सरपणी नदीला पूर आला आहे.

महामार्गावरील वाहतूक बंद

या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली असून. प्रशासनाने महामार्गाची वाहतूक साक्री, नंदुरबार, उच्छल यापर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. घटनास्थळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या असून विसरवाडी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

वाहनधारकांनी केला संताप व्यक्त

महामार्गाचे ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे यासाठी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही कारवाई होत नसल्याने गावकरी व वाहनधारक यांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रशासन विकास कामांकडे लक्ष द्या

विसरवाडी येथील पूल पाण्याखाली गेल्याने स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो बाजारातून घरी किंवा घरून रुग्णालयात जाण्यासाठी स्थानिकांना धोकेदायक पद्धतीने चिमुकल्यांना घेऊन तारेवरची कसरत करून पुल पार करावा लागत आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशी अवस्था ग्रामस्थांची झाल्याने जिल्हा प्रशासनाने विकास कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

काय म्हणतात नागरिक

पूलाचे काम लवकरात लवकर सुरू करा

विसरवाडी येथील पूल कोसळल्याने आमचे प्रचंड हाल होत आहे. पावासामुळे वाहन चालवायला कठीण झाले आहे. पूल क्रॉस करणे धोकादायक झाले आहे. मुलगी आजारी आहे, तिला दवाखाण्यात कस घेऊन जायचे हा प्रश्न आहे. प्रशासनाला एकच विनंती आहे की, या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून दखल घ्यावी.
- त्रस्त नागरिक

आमच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करावी

विसरवाडीचा पूल कोसळल्याची पहिली चौथी वेळ असून पाचवी वेळ आहे. हा पूल कोसळल्याने आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पूल कोसळल्याची घटना कलेक्टर साहेबांपर्यंत पोहचली असेल, किंवा पाचव्यांदा पूल वाहून गेला असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली असेल त्यांनी इथे येऊन परिपूर्ण चौकशी करायला पाहिजे, की लोकांची अवस्था काय आहे, इथले हाल काय आहे, रोड कंत्राटदार मुर्खपणाने काम करता आहे. तरी स्थानिक प्रशासन आणि कलेक्टर महोदयांना एक विनंती आहे की, किमान आमच्या येण्या-जाण्याची व्यवस्था तरी करावी एवढी एक मागणी आम्हा नागरिकांची आहे.
- त्रस्त नागरिक

जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा

प्रशासनाकडे अशा अनेक यंत्रणा आहेत की, या पूलाचे काम पावसाळ्याच्या आधी किंवा पावसाळ्याची आधी या ब्रिजच्या खालच्या सोयीसुविधा करायला हव्या होत्या, नाहीतर मग पावसाळी संपून हे काम पूर्ण करायला हवे होते. इकतेच नाही तर, जिल्हा प्रशासनाने देखील याची काडीमात्र दखल घेतलेली नाही. जवळपास पाचव्यांदा ही परिस्थिती उद्भवली आहे. हा नॅशनल हायवे 2 ते 3 किलो मीटर ब्लॉक झाला आहे. नॅशनल कर्मचाऱ्यांच्या लोकांनी दखल घेतली पाहिजे. यामध्ये जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. किमान जिल्हा प्रशासनाने याची पाहणी ज्यामुळे आम्ही जनसामान्यांचे हाल होणार नाही
- त्रस्त नागरिक

बातम्या आणखी आहेत...