आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी आपत्ती झाल्यास याबाबतची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनास किंवा जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी खत्रींनी विविध विभागांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात २००६ मध्ये तळोदा तालुक्यातील सोजराबारी येथे दरड कोसळल्यामुळे दुर्घटना, २०१६ मध्ये मान्सून काळात अतिवृष्टीमुळे झालेली पाचोराबारी दुर्घटना, २०१८ मध्ये पुरामुळे नवापूर येथे झालेले नुकसान व सन २०१९ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. या बाबींचा विचार घेता सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपत्तीपूर्वी व आपत्तीच्या काळात व आपत्ती काळानंतर संबंधित प्रत्येक विभागाने नियोजनाप्रमाणे तत्काळ प्रतिसाद द्यावा. सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला सादर करावी, असा सूचा दिल्या आहेत.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोबाइल सुरू ठेवावेत गंभीर धोक्याचे ठिकाणी वावर असणाऱ्या लोकांची जीवित व वित्त हानी होवू शकते यासाठी जिल्ह्यातील असे धोकादायक ठिकाणांची जागा निश्चित करुन त्याठिकाणी खबरदारीचे उपाय म्हणून सूचना फलक लावावेत. याशिवाय सर्व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, व्हॉटस ॲप क्रमांकांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. या कालावधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोबाइल सुरू ठेवावेत.
या क्रमांकावर द्यावी आपत्तीची माहिती १जून २०२२ पासून जिल्हा नियंत्रण कक्ष २४तास कार्यान्वित केला आहे. तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीची माहिती तत्काळ ०२५६४-२१०००६ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ यावर कळवावी.
सर्व विभागांना सूचना ^जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवसथापन प्राधिकरणाची मॉन्सून पूर्व आढावा बैठक घेवून सर्व विभागांना आपापली जबाबदारी, कर्तव्याची माहिती दिली आहे. सर्व मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रणा तपासून घेतल्या आहेत. -मनीषा खत्री, जिल्हाधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.