आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गृहरक्षक दलाचे जवानांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
यामध्ये ५० ते ६० गृहरक्षक दलाच्या जवानांनी सहभाग घेतला आहे. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हे प्रशिक्षण देण्यात येत असून, १६ते २३ डिसेंबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांच्यातर्फे समादेशक सदाशिव पाटील, सहायक समादेशक चंद्रकांत पारसकर यांच्या आदेशान्वये एक अधिकारी व आठ कर्मचारी हे या प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात मेडिकल फर्स्टटेड, वॉटर रेस्क्यू ऑपरेशन, सी.एस.आर कॉलेश ऑपरेशन, तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती देण्यात येत आहे.
हे प्रशिक्षण रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळेचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सोनटक्के, जितेंद्र पाटील, सोनल चौधरी, हंसराज पाटील, चंद्रशेखर गवळी, श्रीकांत लवंगे, तौफिक खाटीक, मुकुंदा बाविस्कर हे उपस्थित आहे. ते सहभागी होणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना विविध आपत्तीचे प्रशिक्षण देत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.