आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:दुचाकी लावण्यावरून वाद; चौघांना केली बेदम मारहाण

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पटेल वाडी भागात ३० मेच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास मोटारसायकल लावण्यावरून वाद निर्माण होऊन चौघांना जबर मारहाण करण्यात आली. चाकूने वारही करण्यात आल्याने चार जण जखमी झाले असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

तीन-चार दिवसांपूर्वी फरिदा मोहम्मद नुर यांच्या बहिणीचा मुलगा सय्यद एजाज व रफिक पिंजारी या दोघांमध्ये वादविवाद झाले होते. यातून कुरापत काढून रफिक अय्यूब पिंजारी (वय ४८), सुलतान अय्यूब पिंजारी (वय ३३), रशीद अय्यूब पिंजारी (वय ४०) व एकाने लोखंडी दांड्याने मारहाण व शिवीगाळ केली. या मारहाणीत शेख मुश्ताक मो. नुर शेख, इफ्तेखार मोहंमद नुर शेख, दानिश शेख अफसर, सय्यद एजाज मेहमूद अली सय्यद, सर्व रा.पटेल वाडी हे जखमी झाले. याप्रकरणी वरील तिघांविराेधात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...