आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहादा येथे युवक मित्र परिवार संस्थेमार्फत तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत ५००० सचित्र बालमित्र पुस्तक वितरणाचे उद्घाटन प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचता यावी, गणिती आकडेमोड करता यावी, यासाठी युवकमित्र परिवार संस्थेतर्फे शहादा तालुक्यात ‘लेखन वाचन अभियान’ राबवले जात आहे. याअंतर्गत तालुक्यातील १९३ जि.प. शाळांना मोफत ५ हजार पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी आर.बी. घोरपडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी, हेरंब गणेश ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी, ज्येष्ठ कवी अजबसिंग गिरासे, साहित्यिक करणसिंग तडवी, युवकमित्र संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन, उपक्रम प्रमुख रवींद्र बडगुजर, कल्पेश राजपूत, सुशील गव्हाणे यांच्यासह तालुक्यातील शाळांचे शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक मिळाल्याने अक्षर व अंकओळख होण्यास मदत होणार असून, शंभर टक्के शाळा व विद्यार्थी साक्षर होणार आहे. प्रास्ताविक रवींद्र बडगुजर यांनी केले. आभार करणसिंग तडवी यांनी मानले. रोहित साळुंके, सुजाल पाटील, यश सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.