आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनादेश वाटप:कोरोनात मृत पालिका कर्मचाऱ्याच्या वारसास 50 लाखांचा धनादेश वाटप; मदतीचा धनादेश नगरपालिकेत देण्यात आला

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर पालिकेचे कर्मचारी बाजीराव पवार यांचे कोरोना काळात सेवा बजावत असताना निधन झाल्यामुळे शासनाने त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. या मदतीचा धनादेश नगरपालिकेत देण्यात आला.

नगरपालिकेचे कर्मचारी बाजीराव पवार यांचे कोरोना काळात सेवा बजावत असताना निधन झाल्यामुळे शासनाने त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचा मदत दिली आहे ५० लाख रुपयांचा धनादेश नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कुणाल वसावे व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या हस्ते पवार यांच्या वारस अश्विनी पवार यांना देण्यात आला. यावेळी प्रीतम ढंडोरे, नगरसेवक जगन माळी हे उपस्थित होते.

कोरोना काळात सेवा बजावत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे निधन झाले होते. शासनाने तीनही कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली यापूर्वी दोन कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना धनादेश वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...