आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:भाजीविक्रेत्या महिलांना शालींचे वाटप

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळा ऋतू सुरू झाल्याने भल्या पहाटे भाजी विक्रेत्या महिलांना मार्केटमध्ये दाखल व्हावे लागते. अशा अल्पभूधारक भाजी विक्रेत्या महिलांना उद्योजक जगदीश सितपाल यांच्या माध्यमातून थंडीपासून बचाव करणाऱ्या शालीद्वारे मायेची ऊब मिळाली. शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज व्यापारी संकुलात दररोज भाजीपाला विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिला भगिनींना रविवारी सकाळी उद्योजक जगदीश सितपाल आणि महेंद्र चौधरी यांच्या हस्ते उबदार शालींचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या आजीबाईंनी समाधान व्यक्त करत मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी सर्व ज्येष्ठ महिलांना महेंद्र चौधरी यांच्यातर्फे अल्पोपाहार देखील देण्यात आला. या प्रसंगी मंगळ बाजारातील व्यापारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...