आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:युवा खेळाडूंना क्रीडा साहित्याचे वाटप

सारंगखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​महात्मा फुलेंना महात्मा पदवी बहाल केल्याच्या दिनानिमित्ताने कोठली येथील युवकमित्र परिवार संस्थेतर्फे युवा खेळाडूंना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्याचा खेळाडूंना आपल्या क्रीडा विकासासाठी मोलाची मदत होणार आहे.

या वेळी खेळाडूंना मोफत फुटबॉल, बॅडमिंटन साहित्य, उच्च गुणवत्तेच्या बॅट व बॉल मोफत देण्यात आले. क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं.सदस्य नितीन पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्र परिवाराचे अध्यक्ष प्रवीण महाजन, डॉ.प्रवीण पाटील, युवकमित्र परिवाराचे समन्वयक बादलसिंग गिरासे, प्रवीणसिंग गिरासे, दीपक राजपूत हे उपस्थित होते. गावातील जास्तीत जास्त युवकांनी क्रीडा प्रकारात भाग घेऊन नामांकित खेळाडू बनावे, आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जिंकाव्या असे प्रतिपादन केले. या वेळी युवकमित्र यूथ क्लबचे खेळाडू राहुल गिरासे, भरत साळवे, संग्राम गिरासे, नागूशेठ गिरासे, उमेश माळी, दादू पाटील, लक्ष्मण साळवे, प्रेमसिंग राजपूत यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. खेळाडूंना बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट खेळाचे साहित्य मोफत भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी गोपाल अजबसिंग गिरासे यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...