आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:शहरात गरजवंतांना केले उबदार वस्त्रांचे वितरण ; मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचा उपक्रम

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करीत येथील मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरील गरजूंना थंडीपासून बचाव करणाऱ्या उबदार वस्त्रांचे वाटप करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष महेंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

नवीन वर्षाचे स्वागत सामाजिक बांधिलकी जपून करण्याचे ध्येय बाळगून महेंद्र चौधरी यांनी असोसिएशनच्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक गरजू आणि गरीब माता-भगिनींना गरम शालींचे वाटप केले. याप्रसंगी क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण मराठे, दीपक मराठे तसेच मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे पवन बागुल, पप्पू मराठे, गौरव सोनार, सुनील जैन, प्रेमचंद्र राजपूत, नीलेश पांडे, राजू न्हावी, यशराज मराठे, जयेश मराठे, रवी भोई, कृष्णा मराठे आदी उपस्थित होते.सध्या थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून गरीब, गरजूंना थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...