आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड चाचणी:आज जिल्हा वरिष्ठ गट व्हॉलिबॉल निवड चाचणी

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार जिल्हा वरिष्ठ गटाच्या पुरुष जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा शिनकर नगर व्हॉलिबॉल ग्राउंड कोकणी हिल परिसर नंदुरबार येथे ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

ही निवड चाचणी स्पर्धेतून नंदुरबार जिल्ह्याचा वरिष्ठ गट पुरुष संघ निवडला जाणार असून हा संघ वरोरा (जि.चंद्रपूर) येथे दि.१५ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गट आंतरजिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तरी व्हॉलिबॉल खेळातील खेळाडूंनी वरिष्ठ गटाच्या पुरुष जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...