आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Nandurbar
  • DJ free Immersion Procession To Be Held In Nandurbara For The First Time; 16​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​| Marathi News

बाप्पाला निरोप:नंदुरबारात पहिल्यांदाच निघणार डीजेमुक्त विसर्जन मिरवणुका; 16​​​​​​​ उपरस्ते केले बंद

नंदुरबार21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पोलिस प्रशासनासह मंडळाचे पदाधिकारी सज्ज झाले आहेत. शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यातील २३७ तर शहरात ४१ श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. मानाचा श्री दादा गणपती मंडळाच्या मिरवणुकीला सकाळी दहा वाजेला सुरुवात होईल. शहरात साधारण ५ किमी विसर्जन मिरवणूक मार्गावर ही मिरवणूक २० तास चालेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर मिरवणूक मार्गावरील जवळपास १६ उपरस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक वाद्य वाजून यंदा डीजेमुक्त मिरवणुका निघणार आहेत. वाहतुकीची कोंडी लक्षात घेता त्या मार्गावरून वाहतूक बदल करण्यात आले आहे. तसेच यंदा दोन ड्रोन कॅमेऱ्याची विसर्जन मिरवणुकीवर नजर राहणार असून व्यापाऱ्यांच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या सहाय्याने विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

या मार्गावरील वाहतूक बंद
नगरपालिकेपासून मंगळ बाजार परिसरातील मार्ग, हुतात्मा स्मारक रस्त्यापासून मंगळ बाजार परिसरातील मार्ग, भोई गल्ली व मराठा गल्लीपासून मंगळ बाजार परिसरातील मार्ग, हुतात्मा स्मारक रस्त्यापासून ते तूप बाजार परिसरातील मार्ग, गणपती मंदिर चौक परिसर, हाट दरवाजापासून सोनार खुंटकडे जाणारा मार्ग, मन्यार मोहल्ला चौकपासून गणपती मंदिरकडे येणारा मार्ग, फडके चौकपासून टिळक रोडवर येणारा मार्ग, जळका बाजार चौक, साक्री नाका पासून सोनार गल्लीपर्यंतचा मार्ग, जळका बाजारपासून चौधरी गल्ली साक्री नाकापर्यंत, चव्हाण चौकापासून शिवाजी रोडपर्यंत, देसाई पुरापासून शिवाजी रोड मार्ग,अमर टॉकीज ते देसाई पेट्रोल पंप पर्यंतच्या मार्ग. मोठा मारुती मंदिर ते शिवाजी रोड, अमर टॉकीज ते मंगळ बाजार पर्यंतचा मार्ग बंद केले आहेत.

तापी नदीवर आपत्ती व्यवस्थापनाची १० युवकांची टीम सज्ज
तापी नदीत विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहाद्याचे तहसीलदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने प्रकाशा येथील तापी नदीवर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १० युवकांची टीम सज्ज केली आहे. शिवाय मोठा पोलिस बंदोबस्त राहील. दरम्यान, नगरपालिकेच्या वतीने राम रहिम उत्सव समितीच्या वतीने गणपती मंदिराजवळ गणेश मंडळाचे स्वागत करण्यात येणार आहे.

शिवनसह तापीवर होणार विसर्जन : शहरातील सोनी विहिरीजवळ पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान मानाच्या श्री दादा गणपतीचे विसर्जन होईल. तर काही मंडळे प्रकाशा येथे तापीत तर काही मंडळे हातोडा पुलावर जाऊन विसर्जन करतील. तर काही मंडळ श्रींचे विसर्जन शिवण नदीवर होणार आहे.

असा असेल पोलिस बंदोबस्त
१ जिल्हा पोलिस अधीक्षक, १ अतिरिक्त अधीक्षक, ६ उपविभागीय अधिकारी, १९ पोलिस निरीक्षक, ६१ सहायक निरीक्षक, ७२९ पोलिस, ५०० पुरुष व १०० महिला होमगार्ड, विशेष पथक, दंगा नियंत्रण पथक, एसआरपी प्लॅटून, शीघ्र कृती दलाचे पथक असा बंदोबस्त आहे. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर, निरीक्षक किरणकुमार खेडकर, वाहतूक निरीक्षक सुनील नंदवाळकर बंदोबस्तात असतील.

बातम्या आणखी आहेत...