आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शहरातील शांतता कायम ठेवावी, असे आवाहन येथे पोलिस ठाण्याच्या आवारात अक्कलकुवा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी शनिवारी संध्याकाळी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
या बैठकीला तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, नगरपालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चौधरी, ज्येष्ठ नेते डॉ.कांतिलाल टाटिया, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, हेमलता शितोळे, भाजप तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, माकपचे तालुका सचिव सुनील गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, तैलिक समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, माजी नगरसेवक संजय चौधरी, शेगाव पतसंस्थेचे चेअरमन नूह नुरानी, सरकारी वकील जसराज संचेती, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते जितेंद्र जमदाळे, शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, प्रा.लियाकत अली सय्यद, माजी प्राचार्य डॉ.खलिल शेख, रफिक नुरा, दानिश पठाण, आरिफ पिंजारी, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा, शहादा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेंद्र कुवर, पोलिस पाटील भगवान पाटील, मन्साराम दोधाणी, राष्ट्रवादीचे शांतिलाल साळी, माजी नगरसेवक डॉ.योगेश चौधरी अादी उपस्थित होते.
तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनी, देशातील सध्याचे वातावरण, घडलेल्या घटना पाहता आपले शहर आपण सांभाळावे. शांततेचा इतिहास कायम ठेवावा. शांतता समिती सदस्य व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून राहावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी मकरंद पाटील, अभिजित पाटील, डॉ.कांतिलाल टाटिया, अरुण चौधरी, मोहन शेवाळे, प्रा.लियाकत अली सय्यद, अजय शर्मा यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.मोहंमद खाटीक यांनी केले तर आभार पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी मानले.
सामाजिक सलोख्यामुळे हाेते शहराची प्रगती
सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या. शहरातील शांतता धोक्यात येईल, असे कोणत्याही प्रकारचे कृत्य करू नका. वेळोवेळी पोलिसांना माहिती द्या. कायद्याचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सामाजिक सलोख्यामुळे शहराची प्रगती होते, असे या बैठकीत बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.