आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन १९३७ पासून वीज वितरण कंपनीच्या ताब्यात असलेली जागा सद्याच्या जागा मालकाला देण्याचे आदेश कनिष्ठ दिवाणी न्या. वाय. के. राऊत यांनी दिल्यानंतर मंगळवारी वीज वितरण कंपनीचे शहर उपविभागीय कार्यालयाच्या जागेचा ताबा चार बेलिफ यांच्या साक्षीने देण्यात आला. यासाठी दिवसभर वीज वितरण कंपनीचे साहित्य काढण्याची कारवाई सुरू होती. तर वीज वितरण कंपनीला आता पर्यायी जागा शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल.
शहरातील उद्योगपती मदनलाल लालचंद जैन हे ४ हजार ६७ चौरस मीटर व सर्वे क्र २५१/ अ-२ या जागेचे अधिकृत मालक आहेत. ही जमीन १९३७ ते १९८७ पर्यंत भाडयाने दिली होती. त्यानंतर ही जमीन अनाधिकारपणे वीज वितरण कंपनी वापरात होती. ही जागा मिळावी यासाठी जैन यांनी न्यायालयात २००० मध्ये अर्ज केला. त्यांच्याबाजूने दिवाणी कनिष्ठ न्यायालयाचे अे एस काझी यांनी २००६ मध्ये निकाल देत वीज वितरण कंपनीने जागा मालकाला ताबा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर जमीन संपादनासाठी वीज वितरण कंपनीने १ कोटी २५ लाख रूपये जमाही केले. तर मंगळवारी कनिष्ठ न्यायालयाच्या वाय. के. राऊत यांनी वीज वितरण कंपनीचे साहित्य काढून जमीनीचा ताबा घ्यावा असा आदेश दिला.. दिवसभर वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्या मनिषा राऊत हया बेलिफशी चर्चा करीत होत्या. त्यांनी मात्र कुठल्याही कागदपत्रांवर सहया करण्यास नकार दिला. मात्र न्यायालयालयाच्या आदेशाचे पालन करीत सर्व साहित्य काढून दोन वाहनात भरण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.