आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक रंगभूमीदिन साजरा:बालकलावंतांना दर रविवारी नाट्याचे धडे

नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वच क्षेत्रातील कलावंतांनी एकत्रित येऊन जागतिक रंगभूमीदिन साजरा केला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करण्यात आले. दर रविवारी बालकलावंतांना एकत्रित आणून त्यांना नाट्याचे धडे देण्यात येतील, असा संकल्प उपस्थित कलावंतांनी केला. नाट्य चळवळीसाठी सर्वच कलावंतांनी एकत्रित येऊन आपली कला नंदुरबार जिल्ह्याबाहेर पोहाेचवावी, असे सर्वानुमते ठरवण्यात आले.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर भावसार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नाट्य दिग्दर्शक रवीदा जोशी, संगीतकार चंद्रशेखर चव्हाण, सारंगबुआ रोकडे, सिने दिग्दर्शक डॉ. सुजीत पाटील, आयोजक नागसेन पेंढारकर, राम दाऊतखाने, जितेंद्र खवळे, अरुण सोनार, अनिल पाटील, नगरसेवक रवी मराठे, किरण दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. नागसेन पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले.

नाट्यकर्मी मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार, विनोद ब्राह्मणे, जितेंद्र खवळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश चौधरी, एन.टी. पाटील, तुषार सोनवणे, राकेश कलाल, महादू हिरणवाळे, चंद्रमणी बर्डे, निंबा पाकळे, सुनील कुलकर्णी, नारायण अहिरे, आशिष कापडणीस, बालकलावंत राजश्री अहिरे, पार्थ जाधव, नैतिक अहिरे, शशांक जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...