आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार तालुक्यातील १५७ गावांतील गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात ड्रोन फ्लाय करण्यापूर्वी भूकरमापक व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत प्रत्येक घराचे मिळकत, ग्रामपंचायत मिळकत, सरकारी जागा, रस्ते यांचे चुना टाकून सीमांकन करण्यात येणार आहे. नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथील गावठाण जमीन ड्रोनद्वारे मोजणी कामाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते बुधवारी करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
ड्रोनव्दारे गावठाण जमिनीची मोजणी हा केंद्र सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प असून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. नंदुरबार तालुक्यातील मालपूर येथे शुभारंभ करण्यात आला. या वेळी सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख स्वाती लोंढे, गट विकास अधिकारी सुवर्णा पवार, मालपूरचे सरपंच प्रशांत वळवी, पोलिस पाटील गणेश वळवी, काळूसिंग वळवी, एन.जी. पाटील उपस्थित होते.
ग्रामपंचायतीला होणारे लाभ : गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल. ग्रामपंचायतीला कर आकारणी बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख नकाशा उपलब्ध होईल. ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होईल, ग्रामपंचायत मालमत्ता कर निर्धारणपत्र (नमुना क्रमांक ८ नोंदवही) आपोआप तयार होणार असल्याने काम सोयीचे होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.