आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून शहरातील अनेक भागात शुकशुकाट जाणवू लागला आहे. ढगाळ वातावरण व केव्हाही अवकाळी पाऊस पडू शकतो, या शक्यतेमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हाेणाऱ्या शेतमालाच्या आवकवर माेठा परिणाम झाला असून बहुतांश मालाची आवक निम्म्यावर आली आहे. बुधवारी तर त्यापेक्षा कमी आवक झाली. परिणामी हमाल, मापाडींचा रोजगार बुडाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५० मापाडी व १५० हमाल कार्यरत असून सकाळपासून धान्याची आवक कमी झाल्याने अनेक हमाल हे घरी माघारी परतले.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात १३ व १४ रोजी ढगाळ वातावरण हाेते. तसेच मंगळवारी संध्याकाळी तासभर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी भीतीपोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्यासह अन्य शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही. अत्यंत कमी प्रमाणात धान्य विक्रीसाठी आणण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजावर परिणाम झाला.
दुपारी तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोजकेच मापाडी धान्याची मोजमाप करताना दिसले. तर काहींनी विश्रांती घेणे पसंत केले. तर अनेक हमालांनी काम नसल्याचे पाहून सकाळच्या सुमारास घरचा रस्ता धरला. १२ डिसेंबर राेजी सर्वसामान्य हवामान होते. तत्पूर्वी ९ डिसेंबर रोजी बाजार समितीत विक्रीसाठी ज्वारीची ७७ क्विंटल, बाजरी ४३ क्विंटल, लोकवन गहू २० क्विंटल, मका लाल १ हजार ५१८ क्विंटल, अजवान ८ क्विंटल, सोयाबीन ११७ क्विंटल, सूर्यफूल ६० क्विंटल तर ओली मिरची १ हजार ३४१ क्विंटल इतकी आवक झाली हाेती.
तर १३ डिसेंबरला ढगाळ वातावरणामुळे आवक घटली. ज्वारीची आवक निम्म्यावर आली. ज्वारी ३८ क्विंटल, बाजरी १६ क्विंटल, गहू लोकवन केवळ १० क्विंटल, लाल मका १ हजार १२८ क्विंटल, सोयाबीन १०८ क्विंटल, ओली मिरची ४४६ क्विंटल अशी आवक झाली हाेती. थोडक्यात निम्म्यापेक्षाही कमी धान्याची आवक झाली. १३ डिसेंबरला सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावताच दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी धान्याची आवक खूपच कमी झाली. त्यामुळे हमालांनी सकाळी आपल्या घरचा मार्ग अवलंबला. तर अनेक हमाल दुपारी काम नसल्याने विश्रांती करताना दिसले.
कृृषी बाजार समितीत पसरला शुकशुकाट
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातून शेतमालाची बुधवारी राेडावली. धान्याच्या आवकवर पहिल्या दिवशी निम्मे परिणाम झाला. तर बुधवारी तर त्यापेक्षाही कमी धान्य आल्याने बाजार समितीच्या संपूर्ण आवारात शुकशुकाट जाणवत हाेता. व्यापारी, हमाल-मापाडी व बाजार समिती कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी काही वाव नव्हता. त्यामुळे वर्दळ थंडावली हाेती.
हमालांना काम नसल्याने ते परततात घरी
बुधवारी धान्याची आवक नसल्याने आमच्या हाताला जास्त काम नव्हते. काही हमालांना कामच न उरल्याने तसेच येथे थांबूनही उपयाेग हाेणार नसल्याने ते घरी परतले.- संतोष पाटील, हमाल, नंदुरबार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.