आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात हार- कंगण बनवणाऱ्या १५ कारखान्यांत हार- कंगण बनवून तयार असून नंदुरबारच्या हार- कंगणाला गुजरात, मध्य प्रदेश व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हार- कंगणाच्या कारखान्यात सुमारे २५० कामगारांच्या हातांना तात्पुरत्या स्वरूपात का असेना काम मिळाले आहे. होळी उत्सवात साखरेच्या पाकने बनवलेल्या हार- कंगणाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हारून हलवाई यांच्यासह शहरात १५ जणांचे हार- कंगण बनवणारे कारखाने आहेत. होळीच्या २५ दिवसाआधी कारखाने सुरू होतात.
एका कारखान्यात साधारण १० ते १५ जणांना रोजगार मिळतो. तसेच प्रत्येक कारागिरांना दररोज ५०० ते ६०० रुपयांचा रोज दिला जातो. आठ ते नऊ तास साखरेच्या पाकपासून कंगण हार बनवण्याचे काम हे कारागीर करतात. एका कारखान्यात साधारण ३०० ते ४०० क्विंटल हार कंगण तयार होत असून, खांडबारा, चिंचपाडा, अक्कलकुवा, खापर, सेलंबा, कुकरमुंडा गुजरातमधील बारडोली, सुरत, मध्य प्रदेशातील खेतिया, पानसेमल आदी भागात नंदुरबारच्या हार कंगणाला मागणी आहे.
किरकोळ १२० रुपये किलोचा दर : नंदुबारला १५ तर शहाद्यात २ हार कंगण बनवणारे कारखाने आहेत. एका कारखान्यात साधारण ७ लाखांचे हार- कंगण, बनतात. त्यामुळे सुमारे १ कोटी २० लाखांपर्यंत उलाढाल हाेत आहे. हार- कंगणची किरकोळ विक्रीचे भाव १२० रुपये तर घाऊक विक्रीत ७२ रुपये किलो दर आहे.
यंदा घाऊक उठाव कमी
यंदा घाऊक व्यापाऱ्यांकडून हार कंगणला उठाव नाही. गतवर्षाच्या तुलनेत हार कंगणच्या दरात किलो मागे दोन रुपये वाढले आहेत. साखरेच्या भावात देखील दोन रुपयांची वाढ झाली आहे. होळीला किरकोळ व्यापाऱ्यांकडून हार कंगण विक्री होतील. ग्रामीण भागातील व्यापारी आमच्याकडून हार कंगण खरेदी करून ती ग्रामीण भागात विक्री करतात. त्यामुळे शहरात ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी होईल.- हारून हलवाई, कारखानदार, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.