आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेनच्या युद्धानंतर राज्यात आणि देशामध्ये अनेक बदल झाले. या झालेल्या युद्धामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली. तसेच आताही संपुर्ण नागरिक या महागाईच्या सोसते आहे. तसेच रशिया-युक्रेनचा युद्धाचा परिणाम हा खत आयातीवर अधिक प्रमाणात झालेला आहे. म्हणून यामुळे यंदा खताच्या दरात वाढ झाल्याने शेतऱ्यांचा याचा चांगलाच फटका बसणार आहे. रशियातून गव्हाची निर्यात बंद असल्याने यंदा गव्हाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाच वर्तवला गेला आहे.
नंदुरबार बाजार समितीमध्ये गव्हाला चक्क 5 हजार 451 रूपये क्विंटलचा दर मिळाला आहे. विशेष म्हणजे गव्हाच्या दरात अनेक चढ-उतार झाले पण असा भाव आजपर्यंत मिळाला नाही. रब्बी हंगामातील गव्हाची आवक सुरु झाली असुन, आता धुळे जिल्ह्यातील छडबील येथील शेतकऱ्याच्या 973 वाणाच्या गव्हाला दर मिळाला आहे. दरम्यान गव्हाच्या झालेल्य़ा लिलावात शेतकऱ्याचे 8 क्विंटल 42 हजार रूपये झाले आहेत.
यंदा वाढली गव्हाची आवक
सध्या मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामाची आवक वाढली असुन नंदुरबार बाजार समितीमध्ये मार्च महिनाच्या पहिल्या आठवड्यापासुन गव्हाच्या आवकाला सुरवात झाली आहे. दिवसाढवळ्या सरसरी 4 हजार प्रती क्विंटल वर येऊन पोहोचली आहे. असे असले तरी 2 हजार 600 सरासरी दर होते. पण गुरुवारी एका शेतकऱ्याच्या 973 या वाणाच्या गव्हाला तब्बल 5 हजार 451 असा दर मिळाला आहे. असे असले तरी युद्धजन्य परिस्थितीमुळे गव्हाला मागणी हा राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी सांगितले आहे.
अवकाळी पावसाचा परिणाम
सध्याच्या परिस्थितीत रब्बी हंगामातील सर्वच पिकांसाठी यंदा पोषक वातावरण होते. मुबलक पाणीसाठ्यामुळे सगळी हंगामी पिके बऱ्यापैकी खराब झाले आहे. आता गव्हाचे उत्पादन सरासरीप्रमाणे मिळाले असले तरी मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे हा परिणाम झालेला आहे.
यामध्ये शेकऱ्याची भुमिका महत्त्वाची
गव्हाचे वाढते दर आणि याचा झालेला सगळा परिणाम शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच यापुर्वी खरिपातील सोयाबीन आणि कापसाबाबत असेच झाले होते. व याचा फायदा आम्हा शेतकऱ्यांना शेवटच्या टप्प्यात झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.