आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:खासगी डॉक्टर, संस्थांसह लोकप्रतिनिधींच्या‎ सहकार्यातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्न‎

नंदुरबार‎8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार‎ जिल्हा हा आदिवासी बहुल‎ अतिदुर्गम आहे. त्यामुळे या‎ जिल्ह्यात कुष्ठरोगाचे रुग्ण आहेत. ‎वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत खासगी ‎ ‎ डॉक्टर व सामाजिक संस्था तसेच ‎राजकीय लोकप्रतिनिधी यांच्या ‎प्रयत्नाने कुष्ठरोग निर्मूलनासाठी ‎प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी‎ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात ‎ ‎ आले असल्याची माहिती जिल्हा ‎परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ‎रघुनाथ गावडे यांनी दिली आहे.‎ येथील जिल्हा परिषदेच्या‎ याहामोगी माता सभागृहात कुष्ठरोग ‎शोध मोहीम पंधरवडा निमित्त ‎आयएडीव्हीएल, हिंद कुष्ठ निवारण‎ संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन‎ नंदुरबार, जिल्हा सहायक संचालक‎ कुष्ठरोग यांच्या संयुक्त विद्यमाने‎ वैद्यकीय अधिकारी व खासगी‎ डॉक्टरांची कुष्ठरोग या विषयावर‎ कार्यशाळा घेण्यात आली. या‎ कार्यशाळेचे उद्घाटन नांदेड येथील‎ महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग निवारण‎ समितीचे अध्यक्ष डॉ पी. डी.‎ जोशी-पाटोडेकर यांच्या हस्ते‎ करण्यात आले.

कार्यक्रमाचे‎ अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी‎ अधिकारी रघुनाथ गावडे हे होते. या‎ वेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी‎ म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.‎ चारूदत्त शिंदे, कुष्ठरोग विभागाचे‎ सहाय्यक संचालक डॉ. नितीन‎ भालेराव, जिल्हा कुष्ठरोग विभागाचे‎ सहाय्यक संचालक डॉ. अभिजीत‎ गोल्हार, आयएमएचे अध्यक्ष डॉ.‎ राजकुमार पाटील, त्वचारोग तज्ञ‎ डॉ. योगेश देसाई, निरीक्षक डॉ.‎ राजेश कोळी, सहाय्यक जिल्हा‎ आरोग्य अधिकारी डॉ. अमित‎ पाटील हे उपस्थित होते. या वेळी‎ विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त‎ केले. त्यांनी कुष्ठरोग निर्मूलनासाठी‎ काय करता येईल, यावर मार्गदर्शन‎ केले. या कार्यशाळेसाठी उपस्थित‎ असणाऱ्या डॉक्टरांना महाराष्ट्र‎ मेडिकल कौन्सिल द्वारे दोन क्रेडिट‎ पॉइंट तसेच सहभाग प्रमाणपत्र‎ देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या‎ नियोजनासाठी कार्यशाळेचे‎ समन्वयक डॉ. स्वागत शाह, डॉ.‎विशाल देसरडा, डॉ. प्रीती वळवी,‎ डॉ. छाया पवार यांनी परिश्रम केले.‎ कार्यशाळेला जिल्ह्यातून वैद्यकीय‎ अधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.‎ विशाल देसरडा आणि डॉ. प्रीती‎ वळवी यांनी केले. शेवटी‎ उपस्थितांचे आभार डॉ. योगेश‎ देसाई यांनी मानले.‎

नंदुरबार येथे कृष्ठरोग विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन करताना मान्यवर.‎ कुष्ठरोग निर्मूलनावर‎ तज्ज्ञांनी केेले मार्गदर्शन‎ सर्व वैद्यकीय अधिकारी व‎ डॉक्टरांच्या मदतीने कुष्ठरोग‎ निर्मूलन कशा पद्धतीने करावे व‎ काय उपाययोजना कराव्या यासाठी‎ कुष्ठरोगासंदर्भातील तज्ज्ञ‎ मार्गदर्शक डॉ. डब्ल्यू. एस. भाटकी,‎ बॉम्बे कुष्ठरोग प्रकल्पाचे संचालक‎ डॉ. व्ही. व्ही. पई, हिंद कुष्ठ निवारण‎ संघाचे सचिव उदय ठकार, डॉ. सी.‎ डी. महाजन, डब्ल्यूएचओचे राज्य‎ समन्वयक डॉ. राजेंद्रकुमार सिंग‎ यांनी विविध विषयांवर कार्यशाळेत‎ मार्गदर्शन केले.‎