आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील कॉपर वायरची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात यश मिळाले असेन ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीन गुन्हे उघडकीस आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रजाळे गावात संशयीत आरोपी पवन कोळी, सुकदेव आंनदा कोळी, शेरसिंग ऊर्फ पिन्या चंदुटाकरे यांना ताब्यात घेण्यात आले. दंडाणे गावाचे शिवारातील सुझलॉन पवन उजां कंपनीचे टॉवर क्रमांक के- चे एच.टी. यार्ड मधील ट्रान्सफॉर्मर बॉक्समधून चोरी केल्याचे मान्य केल्याने पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी याचेकडून दहा हजार रुपये किंमतीचे तांब्याच्या बसवार पट्ट्या हस्तगत केले.
देविदास भाईदास भिल (रा. शनिमांडळ तिलाली), हिरामण भिल (रा. तिलाली), आनंदसिंग भिल (रा. बलवंड), रविंद्र भिल (रा. तिलाली) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्यात चोरी केलेली तांब्याची तार दोंडाईचा येथील सईद मुसा खाटीक यास विकल्याचे सांगितले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यास विचारपूस केली असता त्याने देविदास भिल व त्याचे इतर साथीदार यांच्याकडून विकत घेतलेली एक लाखाची तार काढून दिली. तर पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी (वय १८वर्ष, रा. रजाळे) यासही ताब्यात घेतले.
त्याने सुझलॉन कंपनीच्या तांब्याची तारेच्या चोरीच्या गुन्ह्यात साथीदार देविदास भाईदास भिल, अशोक वडार, मोग्या भिल (रा. ढंढाणे) यांनी पंचवीस हजाराची तार चोरल्याचे सांगितले. तर यातील राहुल कोळी, लोटन पाटील, अशोक वडार, मोग्या भिल हे चार आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, अपर अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रविंद्र कळमकर, यांनी ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.