आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:मध्य प्रदेशात निवडणूक; तपासणी नाके केले सुरू

खेडदिगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील त्रिस्तरीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या खेडदीगर येथील अंतर राज्य महामार्गावर वाहन तपासणीसाठी सीमा तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहे.

मध्य प्रदेश राज्यात स्थानिक स्वराज्य संथाची निवडणूक जाहीर होऊन ती तीन टप्यात घेण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्यात महाराष्ट्र राज्य सीमेला लागून असलेल्या बडवाणी जिल्ह्यात २५ जून रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश शासनाने सीमालागतच्या जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यातील पोलिस व प्रशासकीय अधिकारी यांची सेनधवा म.प्र. येथे ता.१६ जून रोजी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यात तपासणी नाके कार्यान्वित करण्यावर चर्चा झाली. यावेळी खरगोनचे डीआयजी तिलक सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी बडवाणी जिल्हा पोलिस अधीक्षक दीपक कुमार शुक्ला, आर. डी. प्रजापती, ऋषिकेश रावले, तपस्या परिहार, ए. डब्यू. माने, डी. एम. पुंगर, एस. बी. सिरसाठ, एन. जी. पवार, अवतारसिंह चौव्हाण, प्रमोद भामरे, चेतन गिरासे, डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...