आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक विजेअभावी त्रस्त:एकतानगरसह नळवारोड परिसरात चार दिवसांपासून विजेचा लपंडाव

नंदुरबार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायंकाळी पडणारा पाऊस, वादळ, विजांचा कडकडाट यामुळे उड्डाणपुलापलीकडील एकतानगर परिसरात चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे वैशाली नगर परिसरातील नागरिक उकाडा, अंधाराशी सामना करत असताना चांगलेच संतापले आहेत. नळवा रोडवरील बहुतांश भागातील नागरिक विजेअभावी त्रस्त झाले आहेत. यामुळे नागरिक वीज कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन विचारणा करीत आहेत.

अनंत चतुर्दशीपासून दररोज सायंकाळी विजेचा कडकडाट व तासभर पाऊस असे समीकरणच झाले आहे. एकतानगर या भागात ३१ केव्ही उपकेंद्रात वारंवार फॉल्ट होत आहे. तसेच इन्सुलेटर, कंडक्टर खराब होत आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना वीज खंडितमुळे अनेक समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे.

हा प्रकार अनेक वर्षांनंतर पुन्हा अनुभवायला मिळत आहे. वृंदावन नगरात पहाटे तीन वाजेला वीज आली. शहरात बागवान गल्लीत वीज गायब होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा अनुभवाला येत असल्याची भावना नागरिकांमध्ये उमटत आहे. रेल्वेरुळापलीकडील भागात ४ दिवसापासून समस्या भेडसावत असल्याने नागरिकांनी वीज अधिकाऱ्यांना जाब विचारला.

अनियमित विजेमुळे उपकरणेही जळाली
आमच्याकडे चार दिवसांपासून वीज नाही. कमी वेळ वीजपुरवठा असतो. अधिक वेळ नसतो. आमचे उपकरणेही जळाली. यामुळे मोठे नुकसान झाले.
सुलभा महिरे, वैशालीनगर, नंदुरबार

पुरवठा सुरळीतचा प्रयत्न
बऱ्याचशा भागात वायरी जीर्ण झाल्या आहेत. पाऊस पडल्यावर पेट्रोलिंग करून फॉल्ट शोधावा लागतो. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
लीना नागपुरे, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...